Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज ताराचा वापर करून वाघाची शिकार; तीन पंजे व डोक्याचा भाग गायब

दोन दिवसांपूर्वी शिकार झाल्याचा अंदाज..गडचिरोली वनविभागात येत असलेल्या चातगाव वनपरिक्षेत्रातील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

OMPRAKASH CHUNARKAR 

गडचिरोली वनविभागात असलेल्या चातगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमाक ४१७ नियत क्षेत्र अमीर्झा येथे मंगळवार दि,२४ ऑक्टोबर ला सकाळी ६:३० वाजता दरम्यानवाघा ची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे . विशेष म्हणजे, वाघाची शिकार दोन दिवसाआधी उच्च दाबाच्या वीज ताराचा वापर करून वाघाचा बळी घेण्यात आल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला तर दुसरीकडे वनाधिकारी घटनास्थळी पोहचण्याआधीच शिकार्यांनीच मृत वाघाचे तीन पंजे व डोक्याचा भाग कापला गेला त्या ठिकाणाहून रक्त स्त्राव होत असल्याने दिसून आले .मात्र उपवनसंरक्षक यांनी अंत्यंत गोपनीयता ठेवत काहीच कर्मचार्यांना आपल्या सोबत ठेवून मोबांईल वापरण्यास बंदी घातली असल्याचे खास सूत्राकडून माहिती मिळाली आहे . हा वाघ आजवर वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात आढळून आलेला नाही, हे येथे उल्लेखनिय आहे. परिसरात नवीन वाघ दाखल झाल्याचे वनविभागाला माहिती नसणे, हेही येथे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली दि,२४ :  उच्च दाबाच्या वीज ताराचा वापर करून एका वाघाचा बळी घेण्यात आला असून तीन पंजे व डोक्याचा भाग गायब करण्यात आले असल्याची घटना गडचिरोली वनविभागात येत असलेल्या चातगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमाक ४१७ नियत क्षेत्र अमीर्झा येथे मंगळवार दि,२४ ऑक्टोबरला सकाळी ६:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. विशेष म्हणजे, ही शिकार दोन  दिवसापूर्वी झाली असून वाघ चार वर्ष वयाचा असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी व्यक्त केला आहे . गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा , सहाय्यक वंनसंरक्षक संकेत वाठोळे उपविभागीय वनाधिकारी ( दक्षता) आदींनी घटनास्थळ गाठून पाहणी केली आहे हे विशेष असले तरी याप्रकरणी वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली वन विभागातील चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा ४१७ वन कक्षामध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाचे एक पथक यास्थळी पोहोचून अधिक चौकशी केली असता उच्च दाबाच्या वीज तारेचा शॉक लावून वाघाची शिकार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याबाबत अधिक साशंकता निर्माण झाली आहे. कारण ही शिकार दोन दिवसांपूर्वीच झाल्याची स्पष्ट माहिती सूत्रांकडून लोकस्पर्शला मिळाली आहे. मात्र वनविभाग याबाबत कमालीची गोपनियता बाळगून असून याबाबत अधिक बोलण्यास टाळाटाळ करीत आहे. हा वाघ आजवर वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात आढळून आलेला नाही, हे येथे उल्लेखनिय आहे. परिसरात नवीन वाघ दाखल झाल्याचे वनविभागाला माहिती नसणे, हेही येथे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बावरिया टोळीने याच भागात केली होती दोन वाघांची शिकार ..

विशेष म्हणजे, याच परिसरात बावरिया टोळीने शिकारीचा तांडव माजविला असून गेल्या दोन महिन्यात या टोळीने दोन वाघांची शिकार केली आहे. या प्रकरणात १८ आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांना कारागृहात पाठविण्यात आले आहे. त्याचा तपास अजूनही सुरूच आहे. या आरोपींमध्ये वनविभागातील सेवानिवृत्त अधिकारयांचा समावेश उघडकीस आला असून वन विभागाचा तपास सुरु आहे .

पुन्हा वाघाची शिकार, हत्तीचाही कळप दाखल..

चातगाव वनपरिक्षेत्रात पुन्हा एका वाघाची शिकार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याच भागात जवळपास २३ ते २५  हत्तीचा कळप दाखल झाला आहे. गडचिरोलीसारख्या नैसर्गिक अधिवासात एवढ्यात वाघ आणि हत्तींचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत असले तरी वनविभाग मात्र या वन्यजीवांच्या सुरक्षितेसाठी तत्पर असल्याचे सांगत आहे. यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र तरीही वाघाची शिकार होणे अतिशय गंभीर बाब आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाघाची शिकार झाली असताना या पथकाला किंवा वनविभागाला शिकारीची माहिती न मिळणे हे संशयास्पद आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एकीकडे वाघाची शिकार होत आहे. तर दुसरीकडे हत्तीच्या संरक्षणासाठी पथक तैनात करून लागेल ती यंत्रणा वापरून लाखो रूपयांचा चुराडा केला जात आहे. अशातच शेतकरीवर्ग मात्र नुकसानीपासून बचावलेला नाही. वनविभागाकडून वाघाचे संरक्षण करण्यात अपयश येत आहे. तर हा विभाग आता हत्तीचे संरक्षण कसे करणार, हेही पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

तर हत्तीही पडू शकतात शिकारीचे न…

दरम्यान, उच्च दाबाच्या वीज तारांचा वापर करून याचाची शिकार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही शिकार नेमकी वाघाची करायची होती की हत्तीची हा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण ४१७ वन कक्षा जवळ नाही शेतकऱ्यांच्या जमीन आहेत ना शेतकार्याचे उभे पिक आहेत. अशातच जंगलात लावलेल्या उच्च दाबाच्या वीज ताराचा वापर नेमका कशासाठी हे समजणे वन विभागाच्या अधिकार्यासमोर मोठे आवाहन आहेत .तर गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे. यातून हत्तीची शिकार करण्याचा डाव तर रचण्यात आला नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चिटकी गावात असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे याबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.

चातगाव वनपरिक्षेत्रातच का होतात शिकार..

गडचिरोली वन विभागात असलेल्या चातगाव वनपरिक्षेत्रात वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. या भागात प्रत्येक महिन्यातच वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशा स्थितीत या वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी झोपा काढतात काय, असा सवाल संतप्त वन्यजीवप्रेमींकडून केला जात आहे.गेल्या दोन वर्षात अमिर्झा परिसरात एका कॉलर आयडी लावलेल्या वाघाचा मृत्यू झाला होता. ही बाब तब्बल १० ते १५ दिवसानंतर वनविभागाला कळाली. यातून त्यांची कार्यतत्परता लक्षात येते. याशिवाय लगेचच महिनाभारात दुसऱ्या एका वाघाचा मृत्यू झाला. एकंदरीत एकामागोमाग दोन  वाघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे जी-५ नरभक्षक वाघीणीने चार बछड्यांना जन्म दिला ही वनविभागासाठी व वन्यजीव प्रेमीसाठी आनंदाची बातमी होती. मात्र यातच जी-५ च्या दोन बछड्याचे अवशेष आढळून आले होते.त्यानंतर जी-५ ही नरभक्षक वाघीण आणि दोन बछडे यांचा आजतागायत काहीच थांगपत्ता लागलेला नाही. ते नेमके कुठे आहेत, त्यांचे काय झाले, याबाबत वनविभाग अनभिज्ञ आहे. अशातच आता परत याच भागात वाघाची शिकार झाल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

केंद्र सरकारच्या मदतीने वन्यजीवांचे संरक्षण आणि नुकसानग्रस्तांना मदत देणार – मुनगंटीवार

गडचिरोली जिल्हयात दाखल झालेले हत्ती हे छत्तीसगड, ओडीसा मार्गाने आपल्याकडे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून ठिकठिकाणी नुकसान केली जात आहे. वनविभाग त्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र हत्तींना मारता येत नाही. नैसर्गिक अधिवासात वावरणाऱ्या हत्तीचा बंदोबस्त करणे आणि नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देणे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. मात्र त्यासाठी केंद्र सरकारचीही मदत घेण्यात येणार असल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली येथे ‘लोकस्पर्श’ शी बोलताना सांगितले. देशात महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक वन आर्थिक मदत करणारे राज्य आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चौकशीअंती कारवाई करणार- उपवनसंरक्षक..

चातगाव वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उच्च दाबाच्या वीज तारांचा वापर करून वाघाची शिकार करण्यात आली असून तीन पंजे व डोक्याचा भाग गायब केला आहे. याबाबत अधिक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी लोकस्पर्श ला सांगितले..

 

 

 

Comments are closed.