Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. १८ नोव्हेंबर : राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री. मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी ७ डिसेंबर २०२१ रोजी होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुप्रीम कोर्टाचा मुंबई हायकोर्टाला झटका; ‘लैंगिक अत्याचारात स्पर्श केला नाही तरी पॉक्सोचा गुन्हा दाखल होणार’

यशदातीलअधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या पदव्यांची इंडिया वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Comments are closed.