Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! कर्नाटक विधानपरिषद उपसभापतीची रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या

जेडीएसचे नेते एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडली असून त्यात 15 डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

लोकस्पर्श न्यूज  नेटवर्क 

बंगळुरु डेस्क २९ डिसेंबर :- कर्नाटक विधानपरिषदचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये चिकमंगळुरुमधील कादूरजवळच्या रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. कदूर पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये 15 डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या मारहाणीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विधानपरिषदेत 15 डिसेंबर रोजी काँग्रेस सदस्यांनी एस एल धर्मेगौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. तसंच त्यांना खुर्चीवरुन ढकललं होतं. धर्मेगौडा या घटनेने अतिशय दु:खी होते. यावेळी काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चिकमंगळुरु जिल्ह्यातील गुनसागरच्या कडूर तालुक्यात त्यांनी रेल्वेसमोर उडी मारुन जीव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धर्मेगौडा सोमवारी (28 डिसेंबर) रात्री उशिरा आपल्या घरातून कारमधून निघाले होते. बराच वेळ होऊनही ते घर न परतल्याने पोलीस आणि त्यांचे कर्मचारी त्यांना शोधण्यास बाहेर पडले. त्यानंतर आज आज पहाटे रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. धर्मेगौडा यांच्यावर चिकमंगळुरुमधील सरपनहल्ली या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहे.

Comments are closed.