Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली वनवृत्ताच्या वनरक्षक व वनपाल संघटनेच्या अध्यक्षपदी नितेश कुमरे तर सचिवपदी शैलेश करोडकर यांची निवड

  • वनकर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठीत  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २९ डिसेंबर: महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटनेची सभा वन विश्रामगृह आलापल्ली येथे पार पडली. या सभेला प्रदेश महासचिव इंद्रजीत बारसकर, सल्लागार एम. गाजी पटेल, राजेश पिंपळकर, बाळू मडावी, जी. एल. बाळापुरे उपस्थित होते. केंद्रीय सचिव चंद्रशेखर तोम्बर्लावार यांची वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गडचिरोली वन वृत्ताची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अध्यक्षपदी नितेश कुमरे, कार्याध्यक्ष श्रीकांत सेलोटे, सचिव शैलेश करोडकर, उपाध्यक्ष हरीश दहागावकर, महिला आघाडी प्रमुखपदी रसिका मडावी यांची निवड करण्यात आली. तसेच केंद्रीय कार्यकारिणी बाळू मडावी व गाजी पटेल यांची निवड झाली. विभागीय कार्यकारिणीत अध्यक्षपदी एस.पी. धानोरकर कार्याध्यक्ष अतुल कातलाम, सचिव राजेंद्र घोरुडे, उपाध्यक्ष कवीश्वर भांडेकर, सचिन धात्रक, सल्लागार संतोष पडालवार, महिला प्रतिनिधी म्हणून नेहा मांदाडे, निराशा मेश्राम, हर्षा घरत, सहसचिवपदी देवानंद कचलामी, समाधान चाथे, बी.डी. राठोड, चंद्रकांत सडमेक, संघटकपदी एस.पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकारी हजर होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच भामरागड वनविभागाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सुशिल हलामी –अध्यक्ष स्मिता गोंगले – उपाध्यक्ष, केशव शिंदे- कार्याध्यक्ष, शैलेश राऊत- सचिव, कैलाश कांबळे- सहसचिव, गणेश काबेवार – कोषाध्यक्ष, पवन खंडारे – संघटक, गौतम ओईंबे – संघटक, प्रमोद ओक्सा – संघटक, श्रुती निमसरकार – महिला प्रतिनिधी, अजय नैताम सदस्य सदर सभेचे संचालन अनील झाडे क्षेत्र सहायक यांनी व आभार नितीन कुमरे यांनी केले.

Comments are closed.