Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुपरस्टार रजनीकांत यांची राजकीय मैदानातून माघार

एक जाहीर निवेदन देताना रजनीकांत म्हणाले की, आपण कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.

हैदराबाद डेस्क, 29 डिसेंबर:– काही दिवसांपूर्वीच सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळं राजकीय वातावरणात थोडंसं ढवळून निघालं होतं. दक्षिणात्य राज्यांत अभिनेत्यांना दिला जाणारा मान सन्मान पाहता आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणूकांमध्ये मतदार कोणाच्या पारड्यात आपलं जनमत टाकणार याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. तसेच अभिनेता रजनीकांत जर राजकीय मैदानात उतरले तर ते युती कोणत्या पक्षाशी करतील? की भाजपाची बी टीम म्हणून भूमिका निभावतील? अशा अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. पण आता तुर्तास तरी या सर्व गोष्टींना पूर्णविराम द्यावा लागणार आहे. कारण रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रजनीकांत यांनी याबद्दलची घोषणा मंगळवारी केली. एक जाहीर निवेदन देताना रजनीकांत म्हणाले की, आपण कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. पण तामिळनाडूच्या लोकांसाठी नेहमी कार्यरत राहू. रजनीकांत यांनी पुढे आपल्या निवेदनात म्हटले की, गेल्या काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत झालेला बिघाडाला, ते देवाचा इशारा मानतात. त्यामुळे त्यांनी राजकीय पक्ष न बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

रजनीकांत हैदराबादमध्ये आपल्या चित्रपटाचं शूटिंग करत असताना अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, कालच त्यांना येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.