Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतात कोरोनावर नियंत्रणासाठी अमेरिकेने दिला सल्ला

सध्याची भारतातली स्थिती खूप अवघड असून, तातडीने काहीतरी करण्याची गरज आहे. असं अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाउची म्हणाले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वॉशिंग्टन, डेस्क 04 मे :– भारतात दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणं वाढतच आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यात भारतावर आरोग्य सुविधांच्या कमरतेचं संकटही ओढावलं आहे. त्यासाठी अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. आता अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाउची यांनी भारताला कोरोना परिस्थिती नियंत्रण आणण्याचा फॉर्म्युला दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘कोणत्याही देशाला लॉकडाऊन आवडत नाही. मात्र भारतातली कोरोना संसर्गाची सध्याची परिस्थिती पाहता तातडीने काही आठवड्यांसाठी लॉकडाऊन केल्यास कोरोना संसर्गाचं दुष्टचक्र थांबू शकेल,’ असा सल्ला डॉ. अँथनी फाउची यांनी दिला आहे. कोविडबद्दल जागतिक पातळीवर ज्यांच्या मताला मोठी किंमत आहे, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये डॉ. अँथनी यांचा समावेश होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे ते मुख्य वैद्यकीय सल्लागार असून, आतापर्यंत त्यांनी अमेरिकेच्या सात राष्ट्राध्यक्षांसोबत काम केलं आहे. मेरिलँडमधील बेथेस्दा येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफहेल्थ’मध्ये असलेल्या डॉ. अँथनी यांची  ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने शुक्रवारी (30एप्रिल) विशेष मुलाखत घेतली. त्या संवादात त्यांनी भारताला हा सल्ला दिला आहे.

भारतातील सध्याची स्थिती पाहता तातडीने पावलं उचण्याची गरज आहे. लसीकरण कार्यक्रम तर अत्यावश्यक आहेच. पण त्यामुळे तातडीने दिलासा मिळणार नाही, भविष्यातली रुग्णवाढ थांबेल. आत्ता ऑक्सिजन, औषधं, बेड्स आदींसाठी सैरावैरा पळणाऱ्या लोकांना दिलासा मिळण्यासाठी एखाद्या आयोगाची किंवा इमर्जन्सी ग्रुपची (Emergency Group) स्थापना करण्याची गरज आहे. त्यातून सगळ्या प्रकारच्या पुरवठ्याचं नियोजन आणि व्यवस्थापन करता येऊ शकेल. गरज पडल्यास अन्य देशांकडून किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत मागता येऊ शकेल,’ असं डॉ.फाउची म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.