Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये  एका उद्यानातील पुतळ्याची तोडफोड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कॅलिफोर्निया,डेस्क 30 जानेवारी:– अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी हे कृत्य केलं असून मोठ्या प्रमाणात या पुतळ्याचे नुकसान केलं आहे. यामुळे भारतीय नागरिकांसह अमेरिकन नागरिकांसाठी देखील ही खूप मोठी घटना असून याचा तपास करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उत्तर कॅलिफोर्नियाच्या डेव्हिस सिटीतील सेंट्रल पार्कमधील महात्मा गांधीजींचा हा 6 फूट उंच आणि 294 किलो वजनाचा कांस्य पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक डेव्हिस इंटरप्राइस मध्ये आलेल्या वृत्तानुसार, या पुतळ्याचा अर्धा चेहरा आणि पावले गायब असल्याचं आढळून आलं आहे.

वाशिंग्टन डी. सी. मधील भारताच्या दूतावासाने या प्रकरणी गंभीर चौकशी आणि तपास केला जावा अशी मागणी केली आहे. शिवाय या अत्यंत नींदनीय कामासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जावी अशी देखील मागणी केली जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डेव्हिस सिटीचे काउंसिलमन लुकास फ्रीरिक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुटलेल्या अवस्थेतील हा पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला असून 27 जानेवारीच्या सकाळी पार्कमधील कर्मचाऱ्याला तुटलेल्या अवस्थेतील हा पुतळा दिसून आला होता. सॅक्रॅमेन्टो बिने दिलेल्या वृत्तानुसार पुतळ्याची तोडफोड करण्यामागील कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही.

Comments are closed.