Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई महानगरपालिकेत सध्या टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास या तीन गोष्टी सुरू; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • मुंबईतील खड्डेमय रस्ते एका रात्रीत चकाचक करणार होते त्याचं काय झालं?; आदित्य ठाकरेंचा सवाल.
  • खोके सरकारचे लक्ष उद्योग, कृषी क्षेत्रावर नाही; आदित्य ठाकरेंची सडकून टीका.

मुंबई, दि. १८ नोव्हेंबर : मुंबई महानगरपालिकेच्या कामांवरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुंबई महानगरपालिकेत सध्या तीन गोष्टी सुरू आहेत; त्या म्हणजे टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास. याशिवाय आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्यांच्या डागडुजीवरून देखील टीकास्त्र डागलं. मुंबईतील खड्डेमय रस्ते एका रात्रीत चकाचक करू आणि त्यासाठी ५ हजार कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती; या घोषणेचं काय झालं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसंच राज्यातील खोके सरकारचं लक्ष उद्योग आणि कृषी क्षेत्रावर नसून ते केवळ राजकारणवर आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील कामावर बोलताना म्हणाले की, घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आणल्यानंतर घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात मुंबईतील रस्ते एका रात्रीत चकाचक करण्यासाठी ५ हजार कोटी रुपये देणार या बरोबरच, दहीहंडीला खेळाचा दर्जा, राज्यात फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प आणणार या घोषणांचा पाऊस पडला. या सर्व घोषणांचं काय झालं?, असा सवाल ठाकरे यांनी केला.

मुंबईतील खड्डेमय रस्ते चकाचक करण्यासाठी ५ हजार कोटींचे टेंडर काढण्यात आलं, मात्र ते रद्दही करण्यात आले. मग आता रस्त्यांचे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. दरवर्षी दोन ते अडीच हजारांचे टेंडर निघत होते परंतु आता ते निघत नाही आहेत. डेंडर रद्द झाल्यानंतर हे ५ हजार कोटींचे रस्ते बनवणार कधी? एका रात्रीत चकाचक रस्स्ते कधी करणार? एखादा रस्ता बवण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करावं लागतं. एका रात्रीत कसं काय रस्ते चकाचक करणार, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

दोघाआरोपींना नऊ लाखाच्या मुद्देमालसह भिवंडी पोलिसांनी केली अटक

 

 

Comments are closed.