संस्कृती सोबत आरोग्य, पोषण यांचे ही मार्गदर्शन महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुढाकार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
महागाव: भारतीय संस्कृती मध्ये महिलांचा कार्यक्रम मकरसंक्रांत याला फार महत्त्व आहे.महिला विशेष सजून या दिवसात हळदी कुंकू साठी व वान वाटतात किंवा घ्यायला जातात मात्र अनेक विभागाच्या महिलांना कर्तव्यामुळे हा सण वेळेवर साजरा करता येत नाही विशेषतः आरोग्य विभाग च्या महिला या कर्तव्यावर असतात त्यामुळे प्राथमिक महागाव आरोग्य महागाव यांनी मकर संक्रांत संस्कृती साजरा करण्यासह महिलांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर, जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदन योजना यांची माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव च्या वैद्यकीय अधिकारी डॉ लूबना हकीम यांच्या संकल्पनेतून महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम तथा वाण वाटप करन्याची संकल्पना सुचली आणि याच कार्यक्रमात महिलांना,गरोदर मातांना,बाळंतपण झालेल्या मातांसाठी असलेल्या विविध योजनेची माहिती दिली.
ग्रामीण भागातील महिलांना व नागरिकांना आजही अनेक योजनांची माहिती नाही त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात त्यामुळे डॉ लूबना हकीम यांनी अनोखी संकल्पना राबवून महिलांना एकत्र करून मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे शून्य ते १ वर्ष वयोगट मध्ये मोडणारे लहान बालक,यांच्या साठी सकस आहार याची ही माहिती यावेळी देण्यात आली.उपस्थित महिलांना या वेळी वान ही देण्यात आले.
तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे ए.एन.एन व आशा वर्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.आरोग्य सेवेतील हे दुवे अत्यंत महत्वाचे असून ग्रामीण भागात ग्राउंड लेव्हल ला या काम करीत असतात त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महागाव चे सरपंच पुष्पा ताई मडावी LHV गोगे, ए एन एम डोंगरे, ए एन एम दुर्गे तसेच इतर आरोग्य कर्मचारी आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
Comments are closed.