Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली विविध महाविद्यालयात जन्मोत्सव निमित्त संत तुकाराम महाराजांची सुभाषित या विषयावर वक्तृत्व स्पर्धा या उपक्रमाचे आयोजन.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील निवडक पाच महाविद्यालयीन केंद्रावर संत तुकाराम महाराजांची सुभाषित या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. महिला महाविद्यालय गडचिरोली,जनता महाविद्यालय चंद्रपूर, नेवजाबाई हितकारीनी महाविद्यालय ब्रह्मपुरी, शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि राजे विश्वेश्वर महाराज महाविद्यालय भामरागड येथे वक्तृत्व स्पर्धेसाठी केंद्र निश्चित केली आहे. प्रत्येक महाविद्यालयीन केंद्रावर स्पर्धा समन्वय म्हणून स्थानिक प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे.

प्रत्येक महाविद्यालयीन केंद्रावरती स्पर्धकांना आपापली नावाची नोंदणी करायची आहे. यासंबंधी पत्र विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नेमून दिलेल्या महाविद्यालयीन केंद्राकरिता वकृत्व स्पर्धेसाठी स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आले आहे.
प्रथम बक्षीस, २०००/- अभंगगाथा आणि प्रमाणपत्र
द्वितीय बक्षीस, १५००/- अभंगगाथा आणि प्रमाणपत्र
तृतीय बक्षीस १०००/-अभंग गाथा आणि प्रमाणपत्र असे आहे.
या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शिकत असलेले दहावी,बारावी आणि पदवी व पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी भाग घेऊ शकतील.स्पर्धकाला प्राचार्यांनी साक्षांकित केलेले ओळखपत्र असल्यास भाग घेता येईल. स्पर्धा पाचही केंद्रावर दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता घेतली जाईल. अशी माहिती तुकाराम महाराज अध्यासन समन्वयक डॉ. हेमराज निखाडे यांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.