Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर वाचन संकल्प महाराष्ट्र उपक्रम ज्ञानज्योती वाचनालय धरमपूर अहेरी येथे वाचकांच्या हस्ते राबविण्यात आला.
यावेळी सर्व ग्रंथ संपदा एकत्रित करणे, वाचनालयाचे सुशोभीकरण करणे, विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे याची तयारी करण्यात आली. ग्रंथालयातील सर्व ग्रंथांचा परिचय करून प्रचार- प्रसार करण्यात आला.
प्रसंगी वाचन, संवाद, वाचक स्पर्धा, सामूहिक वाचन, ग्रंथ प्रदर्शन व परीक्षण वाचनालयाचे संचालक छत्रपती गोवर्धन यांनी घडवून आणले. शिक्षिका उमा माहेश्वरी यांनीही मार्गदर्शन केले.

Comments are closed.