Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकलव्य रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारी रोजी प्रवेशपूर्व परीक्षा

पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर : राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, देवाडा (ता. राजुरा) येथे प्रवेश पुर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेद्वारे इयत्ता 6 वीत 2220 नवीन तर इयत्ता 7 वी ते 9 वीच्या 1049 रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयात अर्ज सादर करावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुर्गम आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नागपूर कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र ट्रायबल पब्लीक स्कुल सोसायटी (नाशिक) मार्फत सीबीएसई बोर्डाच्या 10 एकलव्य निवासी शाळा चालवल्या जातात. याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, गणवेश आदि सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 7 वी ते 9 वी करिता रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. तर प्रत्येक एकलव्य स्कुलमध्ये इयत्ता 6 वी साठी 30 मुले व 30 मुली अशी 60 प्रवेश क्षमता असणार आहे. या सर्व जागांवर प्रवेशपूर्व परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निश्चिती केली जाणार आहे. दरम्यान एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या इयत्ता 6 वीच्या 60 जागांवर विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. त्यात मुलांच्या 30 जागा तर मुलींच्या 30 जागांचा समावेश आहे. इयत्ता 7वी, 8वी व 9 वीच्या रिक्त जागा प्रवेशपूर्व परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमे व प्राधान्यक्रमानुसार होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तरी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन चंद्रपूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.