आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची शासकीय वसतिगृहाला भेट: विद्यार्थिनींशी साधला संवाद
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज रात्री गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या सोयीसुविधांबाबत आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या शिक्षण आणि राहणीमानाच्या विकासासाठी शासनाकडून त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याबाबत मंत्री उईके यांनी माहिती घेतली.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल मीना उपस्थित होते.
Comments are closed.