Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘अॅग्रिस्टॅक’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली :– शासनाच्या विविध कृषीसंलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने व अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रावर (सिएससी सेंटर) नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 20 जानेवारीपासून ‘अॅग्रिस्टॅक’ (Agristack) डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेद्वारे शेतकरी माहिती संच तयार करून प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) दिला जाणार आहे. जिल्ह्यात एक लाख ७८ हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १४ हजार ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी करून फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) का आवश्यक आहे?
अॅग्रिस्टॅक योजनेत नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान सन्मान निधी आणि विविध सरकारी अनुदान योजनांचा लाभ सहज मिळू शकतो. या आयडीच्या मदतीने शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकरण (C-KYC) करण्याची गरज राहणार नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, आधारशी व बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा किंवा नमुना 8

नोंदणी प्रक्रिया: शेतकऱ्यांनी वरील आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे जाऊन नोंदणी करावी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.