5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत बौद्धगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन
जिल्ह्यातील 203 लाभार्थी घेणार तीर्थदर्शनाचा लाभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत दि. 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण 203 लाभार्थी महाबोधी मंदीर (बौद्धगया) तीर्थदर्शनकरीता पात्र करण्यात आले आहे.
5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूरातून रेल्वे जाणार असून दि. 6 फेब्रुवारीला बौद्धगया येथे पोहोचणार आहे. तर दि. 7 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे. 7 फेब्रुवारीला रात्री सदर रेल्वे बौद्धगया येथून परतणार असून 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता चंद्रपूर येथे पोहोचणार आहे. याप्रमाणे लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी सहायक आयुक्त, समाजकल्याण चंद्रपूर येथे उपलब्ध आहे.
तरी, लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुध डेअरी रोड, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.
Comments are closed.