Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भंडारा रुग्णालया आग प्रकरण अहवालात धक्कादायक माहिती समोर

Get real time updates directly on you device, subscribe now.

भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.

वरिष्ठ अधिकारी आणि 2 परिचारिकांवर हलगर्जीपणा मुळे ही घटना घडली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भंडारा 20 जानेवारी :–  भंडारा जिल्हा रुग्णालयातील  10 नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशी समितीने दिलेल्या अहवालात 2 परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे 10 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

09 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला 50 पानी अहवाल तयार केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात आग लागली असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे एका बॉडी वार्मरमध्ये आग लागली होती. त्यानंतर काही वेळाने आउटबॉर्न विभागात आग पसरली यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या 2 परिचारिकांच्या जर त्यावेळी युनिटमध्ये दोन्ही परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडलीच नसती, असं परखड मत समितीने नोंदवले असल्याचे समोर आले आहे.

तसंच, रुग्णालयामध्ये रात्रपाळीला असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांवर सुद्धा बोट ठेवण्यात आले आहे. रात्रीपाळीला असताना एका डॉक्टरांनी या वार्डाकडे राऊंड मारला नाही. त्यामुळे समितीने वरिष्ठ अधिकारी आणि 2 परिचारिकांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये समिती आपला अहवाल हा भंडारा पोलिसांना देणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.  आरोग्य मंत्रालयाकडून कुणावर गुन्हा दाखल करायचा आहे, त्याबद्दल नावं जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, या प्रकरणी 2 परिचारिका आणि एका सिव्हील सर्जनवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.