Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक चिमणी दिन; चला चिमण्यांंसोबत राहूया!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुख्य संपादक – ओमप्रकाश चुनारकर

भारतात चिमणी हि सर्वच ठिकाणी गावापासून तर शहरापर्यंत आढळून येते. अगदी छोटीशी नाजूक दिसत असून आपल्या घरात तर कधी झाडावर कधी माणसाच्या अवतीभवती सदैव पाहायला मिळते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चिमणीला शास्त्रीय भाषेमध्ये सिकोनिया असे म्हटले जाते. इंग्लिश मध्ये तिला हाऊस स्पॅरो (house sparrow) असे म्हटले जाते तर संस्कृत भाषेमध्ये तिला चटक, वार्तिका ग्रहनीड या नावानी ओळखले जाते.

सकाळी सकाळीच झोपेतून उठल्यावर आपल्याला चिमण्यांच्या किलबिल ऐकू येतो. त्यानंतरच मन प्रसन्न होऊन जात. कधी इकडून घीरटया कधी तिकडून घीरटया मारतांना दिसतात. चिमणी जरी लहान असली तरी त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारख खूप काही असते. चिमणी सकाळी उठ्ल्यावरच ती आपल्या कामाला लागते. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ती सकाळी उठून चाऱ्याच्या शोध घेऊन ठरलेल्या ठिकाणी(आपल्या घरी) येते. चिमणी हि घराच्या भिंतीत असलेल्या खिड़कीमध्ये लावलेल्या काचेच्या आरसामध्ये आपले प्रतिबिंब पाहून चोचीने मारा करताना दिसत असते. चिमणी हि आपल्या कामांमध्ये कधीही कंटाळा करीत नाही. ती सदैव कामात असते. चिऊताईकडून माणसाला शिकण्यासारखे भरपूर काही आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चिमणी ही दिसायला खूपच नाजूक व लहान असून चिमणीच्या कपाळावर, शेपटीवर आणि तिच्या मागच्या बाजूला राखडी, कानाच्या जवळ पांढरा असा रंग असतो, तर तीची चोच काळी असते. देशभरात चिमणीचे सद्या वास्तव्य कमी दिसून येत आहे. चिमण्यांना वेळेवर चारा, पाणी, घरटे बनविण्यासाठी गवत दिवसेंदिवस मिळत नसल्याने अडचणीत आले आहे . शिवाय मोबाईलने जागतिक क्रांती केली आहे त्यासाठी विविध कंपनीच्या रेंजसाठी मोठमोठे टावर्स निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे त्यातून निघालेले रेडीयेशन मुळे चिमण्या काही प्रमाणात लुप्त होत आहेत. आजच्या बालकांना चिमणी फक्त खेळण्यामध्ये दिसू लागली आहे. पूर्वीच्या रेशमी कापडाच्या चिमणीच्या रूपातल्या आज प्लास्टिकच्या खेळण्यांनी जागा घेतली आहे.

अनेक बालगीतात चिमणीचा उल्लेख असतो. बालकांना चिऊताई प्रिय असते. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाळले, डोळे तरी मिटलेले अजूनही या बालगीताप्रमाणे व कवितात चिऊताई बालपणात घेऊन जाते. जागतिक स्तरावर पहिला चिमणी दिन २० मार्च २०१० साली साजरा करण्यात आला. आज अनेक ठिकाणी चिमण्याबद्दल समाजात जागृती दिसून येते. खाद्य तसेच पाणी देण्याबाबत काळजी घेण्यात येत आहे तर अनेक ठिकाणी त्यांना घरट्यांची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गावखेड्यात असलेल्या चिमण्यांच्या चिवचिवाट आता शहरातही ऐकू येऊ लागला आहे. निसर्ग चक्रात चिमणीच महत्वाच स्थान आहे. दरवर्षी २० मार्च हा दिवस चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चिमण्याबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे आजच्या दिवशी छोट्याश्या इवलाश्या चिमणीच्या संवर्धनासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करूया!

चिमणी हे सर्वांना ओळख असलेला लहानसा पक्षी आहे. सुरुवातीच्या काळात कौलारू घरामध्ये त्यांचे घरटे (खोपा) असायचे मात्र आज खेड्यापासून तर शहरापर्यंत सिमेंटचे पक्के घरे बांधण्यात येत आहे. कौलारू छताच्या जागी सिमेंटचे पत्रे, टिनाचे पत्रे, स्लाँबनी जागा घेतल्याने चिमण्यांना घरटे बनविता येत नाही. याशिवाय शेतकरी बांधवांमध्ये अधिक नफा मिळविण्यासाठी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे चिमण्यांना चारा मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली असली तरी चिमण्यानेही आपल्या जीवन मानात बदल केल्याचे दिसून आले आहे. ज्याठिकाणी कौलारूचे घर होते त्याचठिकाणी स्लाँब, टिनाचे, सिमेंट पत्र्याचे घर असले तरी घरातील सिलिंग, खिडक्या, वीट जुडाईच्या फटीमध्ये घरटे निर्माण करण्यास सुरुवात केली असून. खाण्याचा मिळेल तो चारा(अन्नधान्य) खाऊ लागले आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढत असली तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी चिमण्या अवतीभोवती असणाऱ्या परिवारातील नागरिकांनी पाण्याची सोय व खाद्य उपलब्ध करून दिल्यास चिमण्या सुखरूप राहतील. संख्या वाढेल आणि चिमणी सदैव दिसत राहील, हीच अपेक्षा करतोय.”      

डॉ. किशोर मानकर – मुख्य वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त गडचिरोली      

Comments are closed.