Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दत्तात्रय होसबळे रा. स्व. संघाचे नवे सरकार्यवाह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

प्रतिनिधीमिलिंद खोंड

बेंगळुरू, दि. २० मार्च: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांचे निवड करण्यात आली आहे. बेंगळुरू येथे सुरू असलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत होसबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. होसबळे यांचा सरकार्यवाहपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. यापूर्वी ते संघात सह सरकार्यवाह म्हणून कार्यरत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बेंगळुरूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक सुरू आहे. सरकार्यवाह निवडण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक पार पडली. त्यात होसबळे यांच्या नावावर सर्व संमतीने निवड करण्यात आली.

१९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगामी काही वर्षात शताब्दी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर संघकार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात संघाने देशात सेवाकार्याची एक विशाल मोहीम राबवली. या काळात संपर्कात आलेल्या संघटनांना आपलं करण्याचे नियोजनही संघाकडून आखण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण नियोजनाची मुख्य जबाबदारी सरकार्यवाह म्हणून दत्तात्रय होसबळे यांची असेल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

65 वर्षीय दत्तात्रय होसबळे हे संघाचे 2009 पासून सह-सरकार्यवाह म्हणून काम पाहत होते. ते मूळचे कर्नाटकमधील असून, महाविद्यालयीन जीवनात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. नंतर संघाने त्यांना जवळ जवळ 15 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम दिले. या काळात विद्यार्थी परिषदेचा देशाच्या पूर्वोत्तर भागापासून तर अंदमान निकोबारपर्यंत मोठा विस्तार झाला. ज्याचे श्रेय दत्तात्रय होसबळेंना दिले जाते. त्यामुळेच होसबळे यांना अनेक वेळा संघाचे तरुण नेतृत्व म्हटल्या जाते. गुवाहाटी येथील युवा विकास केंद्र स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

दत्तात्रय होसबळे हे इंग्लिश लिटरेचरमध्ये पदव्युत्तर असून त्यांचे संस्कृत आणि त्यांची मातृभाषा कन्नड आहे. याशिवाय अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. देशविदेशात त्यांनी संघाची विचारधारा वेगवेगळ्या कार्यक्रमात मांडली असून, नेपाळ भूकंपाच्या वेळी स्वतः तिथे जाऊन त्यांनी सेवाकार्यात मदत केली होती. दत्तात्रय होसबळे हे इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत. ही संघटना एनजीओ असून दिल्लीत आहे. सामाजिक अभ्यास आणि संशोधनाद्वारे समाजाला इतिहासाचे अॅनॅलिसिस, आजची परिस्थितीचे योग्य आकलन करायला मदत आणि उद्या येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देणे हे इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे ध्येय आहे.

विद्यार्थी काळात लादलेल्या आणीबाणीत दत्तात्रय होसबळे हे मिसा कायद्या अंतर्गत जेलमध्ये होते. कन्नड भाषेतील असिमा नावाच्या मासिकाचे ते संस्थापक संपादक ही आहेत.

Comments are closed.