Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर अ‍ॅक्टीव मोडवर

स्वस्त धान्य दुकानातून अवैधरित्या विक्रीस जाणारे धान्यासह १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल केला जप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मिलिंद खोंड

अहेरी, दि. ४ जून : उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी एका महिन्यापूर्वी अहेरीचा पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. रुजू झाल्यापासून त्यांनी परिसरात सुरु असलेल्या अवैध रेती तस्करी, अवैध दारू विक्री आदी विविध अवैध धंद्यावर धडक कारवाया केल्या आहेत. त्यामुळे आल्या आल्याच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर हे अ‍ॅक्टीव मोडवर असल्याचे दिसून येत आहे.

अवैध धंद्यावरील त्यांच्या या धडक कारवायांनी अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशातच अहेरी तालुक्या मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील स्वस्त धान्य दुकानातून अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या धान्य व गुळ असा १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल मुत्तापूर येथे सापळा रचून आपल्या सहकाऱ्यासह जप्त केला आहे.

                जप्त करण्यात आलेला अवैध धान्य वाहतूक करणारा ट्रक्टर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महागाव येथील सत्यम प्रभाकर मडगुलवार सरकारी स्वस्त धान्य दुकानात वितरण करण्यात येत असलेला तांदूळ, गहू व गुळ आदी साहित्याची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी त्यांनी सापळा रचून २१ पोते तांदूळ, ४८ पोते गहू व ४९ नग गुळाचे बॉक्स जप्त केले. या सर्वांची बाजारातील किंमत १ लाख ४३ हजार रुपये आहे. सत्यम मडगुलवार यांनी ट्रक्टरमध्ये सर्व माल भरून मंगळवारी रात्री ११.०० वाजताच्या सुमारास ट्रक्टरचालक वासुदेव तोर्रेम याला रवाना केले होते.

हा माल दुकानात विकून त्या तांदळाला पॉलिश करून जास्त किमतीत विकले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात मोका पंचनामा करून ट्रक्टर पोलीस स्टेशन अहेरी येथे नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अहेरी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा :

सुरजागड प्रकल्पाच्या कामावर जाल तर जीवाला मुकाल; नक्षल्यांची पत्रके टाकून मजुरांना धमकी

राज्यातील विविध उद्योग, आस्थापनांमध्ये १ लाख युवकांना मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी

बारावीच्या परीक्षा रद्द ! : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची घोषणा

Comments are closed.