Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दांपत्यासह चिमुरडीला चाकूचा धाक दाखवून दरोड्यांनी २३ लाखांचा लुटला ऐवज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जळगाव, 4 फेब्रुवारी:  जळगाव शहरातील मोहाडी रोडवर असणाऱ्या दोलत नगरात बुरखाधारी यांच्या एका टोळक्याने व्यावसायिकाच्या घरात जबरीने प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत 23 लाख रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना 3 फेब्रुवारी रोजी बुधवारी पहाटे घडली आहे.

याबाबत वृत्त असे की दौलत नगर परिसरात पिंटू बंडू इटकरे वय पस्तीस हे लोखंडी सामानाचे व्यापारी आपल्या पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांच्या तळमजल्यावर पार्किंग असून वर दोन मजले आहेत. बुधवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास हे तिन्ही जण झोपेत असताना सहा जणांनी घरात प्रवेश केला. त्यांनी इटकरे यांची पत्नी मनीषा यांना तोंड दाबून उठविले. तर पिंटू  इटकरे यांना चाकू लावून घरात काय असेल ते काढून देण्यासाठी धमकावले. घाबरलेल्या इटकारे यांनी घरातील तीन लाख रोकड आणि 20 लाखांचे दागिने घेतल्यानंतर धमकावत हे सहाही जण निघून गेले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सहा दरोडेखोरांपैकी पाच जणांनी संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा घातला होता. तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा लावला होता. सव्वा तीन ते चार वाजेपर्यंत ते त्यांच्या घरात होते. येथून पलायन करताना त्यांनी तळमजल्यावर लावलेल्या सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून घेतला, तर इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाईल घेऊन तो खाली फेकून दिला. भेदरलेल्या इटकरी दांपत्याने उजाडल्यानंतर रामानंद नगर पोलिस स्थानकात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर रामानंद नगर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.