Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ४ फेब्रुवारी: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे केले. या विरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आता शेतकऱ्यांकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे ६ फेब्रुवारीला शेतकरी देशव्यापी चक्काजाम करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चा कडून देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चा चे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी ही घोषणा केली आहे. ६ फेब्रुवारीला १२ ते ३ यावेळेत देशभरातील सर्व रस्ते अडवले जाणार आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जवळपास दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे दडपशाहीच्या निषेधार्थ सहा फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या देशभर चक्काजाम असणार आहे. असे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलिस तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या बळाचा वापर करत पाणी, वीज, अन्नपदार्थ यांचा पुरवठा तोडण्यात आला आहे. भाजपचे कार्यकर्ते स्थानिक व्यापारी असल्याचे भासवत आंदोलकांवर पोलिसांच्या मदतीने दगडफेक करत आहेत. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळावर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकाणी कळविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे. त्यामुळे नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून येत्या ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी देशभरात चक्काजाम करणार आहेत. याकरिता देशभर अनेक राज्यात किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश काकडे हे नियोजन करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.