Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! गळा चिरून पत्नी..दोन वर्षीय मुलीची हत्या ?..

पतीची गळफास घेऊन आत्महत्या परळी तालुक्यातील सिरसाळयातील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड, दि. २५ सप्टेंबर: परळीतल्या शिरसाळा मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे सिरसाळा मधील मोहा रोड परिसरात एकाच कुटुंबातील दोन जणांची हत्या ? करून कुटुंब प्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहा रोड परिसरात घडलेली ही घटना रात्री साडे नऊच्या  सुमारास उघडकीस आली. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अल्लाबकश शेख याने आपली पत्नी, दोन वर्षीय मुलगी यांची हत्या केली ? आणि गळफास घेऊन त्यानं स्वत:ला संपवलं असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आरोपी अल्लाबकाश शेख याने त्याची पत्नी दोन वर्षीय मुलगी यांना गळा चिरून ठार मारले?असा अंदाज वर्तवला जात आहे तर त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला असल्याचे आता समोर आलंय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.