Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याच्या अस्तित्वाची लढाई..

पदाधिकाऱ्यांचे व्यक्तिगत संबंध टिकविण्यासाठी उमेदवाराला माघार घेण्यास दबाव..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर, दि. २५ सप्टेंबर : सध्या पालघर जिल्ह्यात सुरु असलेल्या जिल्हा परीषदा व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरु आहे.या निवडणूकीत शिवसेना , भाजप ,राष्ट्रवादी कॉंग्रेस , बहुजन विकास आघाडी , कॉंग्रेस ,मनसे अशा सर्वच राजकीय पक्षानी जोरदार कंबर कसली आहे. काही पक्षानी युत्या आघाड्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली असून सेना व भाजपा वरचठ दिसत आहेत तर राष्ट्रवादी व आघाडी मोठा प्रयत्न करत आहेत तर कॉंग्रेस मात्र अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका मध्ये कार्यकर्ते टिकवण्यासाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी राजकीय पक्षांसाठी फायदेशीर असतात मात्र आधी कॉंग्रेसच्या नेत्यानी फक्त जिल्हा सहकारी बॅंक , बाजार समिती , खरेदी विक्री संघ यांच्यावरच लक्ष केंद्रीय करून प्रत्येक निवडणूकीत तडजोड करून माघार व युत्या केल्याने आज कॉंग्रेस पक्ष अस्तित्त्वाची लढाई लढताना दिसत आहे.

येत्या काळात हिच स्थिती बहुजन विकास आघाडीवर येउ शकते कारण पालघर तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्तिगत संबंध टिकविण्यासाठी उमेदवाराला माघार घ्यायला लावणे व गरज नसताना युत्या करत बसणे ह्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची कुचंबणा होत असून कार्यकर्ते नैराश्याने इतर पक्षांची वाट धरत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालघर तालुक्यात चहाडे , वसरे , धुकटन , खामलोली, बहाडोली, कोकणेर , लोवरे , निहे , किराट ,बोरशेती ,रावते इत्यादी अनेक लहान मोठ्या ग्रामपंचायतची ताब्यातून जाण्याच्या मार्गावर आहेत. मात्र बहुजन विकास आघाडीचे नेतृत्व सदर विषयाला किती गांभीर्याने घेते हे येत्या २७ सप्टेंबर ला कळेल. निवडणूकीतुन माघार घेणे म्हणजे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या ताब्यात देणे. एकेकाळी ग्रामीण भाग म्हणजे कॉंग्रेसचा गड होता मात्र त्यानी केलेली घोडचूक आघाडी पुन्हा करेल का हे बघण्याचे राहील व त्यावरच इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संघर्ष करून स्वताचा पक्ष टिकवणाऱ्या कार्यकर्त्याचे अस्तित्व ठेवतील का सोमवारी कळेल.

Comments are closed.