Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठवला प्रस्ताव – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि.२१ जानेवारी :  कोविड-१९ आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग ऑनलाईन सुरू असून आता ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कोविड-१९ व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यात कोविड-१९ चा प्रादूर्भाव कमी होत असल्याने महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय
ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे श्री. सामंत यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

वाघाची शिकार करणाऱ्या ६ आरोपींवर गुन्ह्याची नोंंद : वनविभागाची कठोर कारवाई

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा ५ फेब्रुवारीला लागणार निकाल

नक्षल्यांनी रस्त्याचे बांधकाम करत असलेल्या वाहनाची केली जाळपोळ…

 

 

Comments are closed.