Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हेडफोन मुळे कानांसोबत हृदयालाही पोहोचतो धोका!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 04 नोव्हेंबर :- सध्याच्या काळात हेडफोन्स आणि इअरफोन हे आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनते आहेत. काम करायचे असो किंवा निव्वळ गाणी ऐकत वेळ घालवायचा असेल अथवा प्रवास करतांना मल्टीमिडीया कटेंट पाहण्यासाठी ही हेडफोनचा उपयोग केला जातो. यह हेडफोनचा दर्घकाळ वापर केल्याने कानांवर इफेक्ट तर होतोच सोबतच याचा हृदयावर ही परिणाम होत असतो. दीर्घकाळ हेडफोन किंवा इअरफोन मधुन येणारा आवाज आपल्या कानांच्या पडद्याजवळ आदळतो आणि त्यांच्या अतिवापरामुळे कानांच्या पडद्याचे नुकसान होउ शकते.

गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. बराच काळ हेडफोन्स लावून गाणी ऐकल्यास व्यक्तीचे कान सुन्न अथवा बधीर होउ शकतात. यामुळे बहिरेपणाचा धोकाही संभवतो. डाक्टरांच्या मते इअरफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, झोप न येणे अशी अनेक लक्षण दिसून येतात. आपल्या कानांची श्रवण क्षमता केवल 90 डेसिबल असते. जी हळूहळू 40-50 डेसिबलपर्यंत कमी होत जाते. हेडफोन किंवा इअरफोन यांचा अतिवापर हा आपल्या कानांसाठी हानिकारक ठरतोच,पण त्याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने हृदयावर वाईट परिणाम होते. त्यामुळे कैन्सरचा धोका वाढतो. ऑफिसमध्ये किंवा घरी गाणी ऐकतांना तुम्ही तुमचे इअरफोन एकमेकांशी शेअर करने टाळावे. इअरफोन शेअरिंग केल्याने आपल्या कानात संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कानाला होणारा त्रास टाळायचा असेल तर गरज असेल तेव्हाच इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करा. दिवसभरात 60 मिनिटांपेक्षा अधिक काळ इअरफोनचा वापर करू नये. ते धोकादायक ठरू शकते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.