Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क : राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्ल स विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत 80 वर्षांची महिला संगमेश्वरमधील रहिवासी होती.

डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतरही आजार होते. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट बाबतीत सध्या तरी मोठ्या प्रमाणावर रुग्ण नाहीत असं ते म्हणाले. डेल्टा व्हेरियंट बाबतीत सध्या 36 जिल्ह्यामधून नमुने घेण्याचे काम सुरू असून केंद्रीय संस्था NCDC ही राज्य सरकारला मदत करत आहे. सध्या तरी राज्यात कुठलेही निर्बंध लागणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलीसांच्या कार्यक्षमता आणि मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन जिल्ह्यांना करून द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्य विभागास सूचना

राज्यात आतापर्यंत 27 टक्के पेरण्या; हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी – कृषीमंत्री दादाजी भुसे

 

Comments are closed.