Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लम्पि चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर कत्तल खाने बंद ठेवण्याचे आदेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 24, सप्टेंबर :- लम्पि चर्मरोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जनावरांचे लसीकरण वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागांना राज्याच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने जनावरांची काळजी घेण्याचे तसेच शेतकऱ्यांना तसे मार्गदर्शन करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत.

प्रशासकीय कार्यप्रणालीनुसार नाशिक मध्ये देखील जनावरांना होणाऱ्या लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर शहरातील म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करणारे कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वेगाने होत असून जिल्ह्यात ८२ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने महाराष्ट्र राज्य लम्पी चर्मरोग आजाराकरिता नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार जनावरांची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील म्हैसवर्गीय जनावरांची कत्तलखाने पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महात्मा फुले मार्केट आणि भद्रकाली येथील कत्तलखान्यामध्ये म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल केली जाते, ती पुढील सूचना येईपर्यंत बंद करावी असे आदेशात म्हटले आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या नाशिक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने महानगरपालिकेला कत्तलखाने बंद ठेवण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे होणार सुलभ.

रिक्षा टॅक्सी च्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री.

Comments are closed.