Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात ट्विट- एडिटिंगमुळे राजकीय वातावरण तप्त.

शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 24, सप्टेंबर :-  राज्यात सध्या ट्विट , एडिटिंग आणि फ़ोटो शॉपचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. ‘श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा’ असा टोला या ट्विटमधून लगावण्यात आला होता. दरम्यान, आता शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं’? असा सवाल करत शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या दिसून येत आहे. या फोटोवरून राजकारण चांगलचं तापलं असून राष्ट्रवादीने आता पोलिस ठाणे गाठले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शितल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळेंचा ट्विट केलेल्या या फोटोची राष्ट्रवादीकडून पोलखोल करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या वतीने शितल म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. म्हात्रे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्या आहेत असं दिसतं आहे. त्यांच्या शेजारी तत्कालीन आरोग्य मंत्री असलेले राजेश टोपे आणि तत्कालीन गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनीही हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हणत शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. ‘…आता त्यांना सांगा काय ते एडिटिंग, काय ते मोर्फिंग, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस’ असं ट्विट करत वरळी पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंच्या विरोधात केलेली तक्रार देखील ट्विट केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणकुमार बिरादार यांनीही याच फोटो संदर्भात टि्वट करत ओरिजनल फोटो काय आहे आणि त्याचं मॉर्फिंग कसं केलं गेलं आहे ते ट्विट केलं आहे. एवढंच नाही तर शिंदे गटावर टीकाही केली आहे. वाण नाही पण गुण लागला, शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे. हा घ्या पुरावा. असं बिरादार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आहे.

हे देखील वाचा :-

लम्पि चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर कत्तल खाने बंद ठेवण्याचे आदेश.

रिक्षा टॅक्सी च्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री.

Comments are closed.