Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लसीकरण हेच कोरोना महामारीवर सर्वोत्तम उपाय – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

अफवांवर विश्वास न करता प्रत्येक नागरिकांना लस घेण्याचे केले आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आज अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावर जाऊन “कोविशिल्ड” लसीचा पहिला डोस घेतला.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी “लसीकरण” हाच सर्वोत्तम उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने कोरोना प्रतिबंधात्मक लस जरूर घ्यावे, चुकीच्या अफवांवर विश्वास करू नये, लस हे १००℅  सुरक्षित असल्याने लस घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी न चुकता दुसरा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांनी यावेळी केले आहे.

याप्रसंगी त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधून सद्याच्या कोरोना परिस्थितीची पूर्ण माहिती घेतली, या संकटकाळी आरोग्य विभागाने केलेल्या कार्याचे राजे अम्ब्रिशराव यांनी कौतुक केले. तसेच प्रशासनाला सर्वतोपरी मदत करायला आपण व आपले कार्यकर्ते सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी युवा नेते अवधेशराव, प्रवीणराव, डॉ. उमाटे, नरहरी अण्णा सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आरोग्य कर्मचारी हे उपस्थित होते.

हे देखील वाचा :

आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आत्मसमर्पितांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथील कार्यक्रमाप्रसंगी एका जहाल महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली येथे 27 जुन ला स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन शिबीर

 

 

Comments are closed.