Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उंदराला सापडली चिंधी… इकडे ठेवू का तिकडे ठेवू.., मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसेनेचे संजय राऊत यांना टोला

खाते वाटपानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिलीच प्रतिक्रिया.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. १५ ऑगस्ट : मंत्री मंडळाच्या खाते वाटपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप उपाशी तर शिंदे गट उपाशी अशी टीका समनवमधून केली होती. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. उंदराला सापडली चिंदे इकडे ठेवू का तिकडे ठेव या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

खाते वाटपा नंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खाते कुणाला कोणत दिल यापेक्षा सर्व खात्यांवर सामूहिक जबाबदारी ही मंत्र्याची असते. मी जरी पाणीपुरवठा खात्याचा मंत्री असलो तरी माझी इतर खात्यांवर जबाबदारी आहे. मंत्र्याची जबाबदारी ही प्रत्येक खात्याच्या प्रत्येक विभागाच्या काम करण्याची जबाबदारी असते असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. खात तर वाटप करताना थोडं इकडे तिकडे झाला असेल, मात्र काही सापडलं नाही असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उंदराला सापडली चिंधी इकडे ठेवू की तिकडे ठेव असे म्हणत प्रत्यक्ष नाव न घेता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे..

खाते वाटपात जे खाते मिळाल आहे त्यावर समाधानी आहात का असे विचारले असता मंत्री गुलाबराव पाटील मला आधी जे खात होत तेच पाणीपुरवठा खात मिळालं आहे. माझे पूर्वीचेच खाते मला मिळाले त्यामुळे आनंद झाला असेल माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत 34 हजार गावांना पाणी पाजण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला असून आणि गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद असून निश्चितच समाधानी असल्याचे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला है उस जैसा…अशा गाण्याच्या ओळी म्हणून त्यांनी जे खात मिळालं त्याचा आनंद ही व्यक्त केला… सांगितलं की असं म्हणत त्यांनी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खाते वाटपात भाजपचा वरचष्मा दिसून येतो आहे असे विचारले असता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किली करत चष्मा तर मी पण घातला आहे असे उत्तर दिले. यावर उपस्थित त्यामध्ये जोरदार हशा पिकला होता.

हे देखील वाचा : 

वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य यात जिल्हा निर्मितीपासून भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी संजय मीणा

समीर वानखेडे यांना केंद्रीय जात पडताळणी समितीने दिली क्लीन चीट.

 

Comments are closed.