Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजाराम ग्राम पंचायत मधील दलित वस्तीतील विविध समस्या बाबत सभापतीनां निवेदन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, दि. २८ सप्टेंबर: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायत मधील दलित वस्तीतील समस्या जैसे थे असून या ठिकाणी नाली साफसफाई केलेलं नाही,विहिरीतील दूषित पाणी,सिमेंट रस्ते,हातपंपाजवळ चिखलाचे घाण,रास्ताकडील केरकचरा,आदी विविध समस्या घेऊन अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर भाऊ तलांडे यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनातं सभापती म्हटले की,पुढील सात दिवसात आपले समस्या निराकरण करू असे आस्वासन दिले.

या आगोदर गेल्या आठ तारखेला सभापती साहेबांच्या समक्ष,विस्तार अधिकारी राऊत सर,आणि पेसा समन्वयक संजय कोठारी,व प्रशासक कविता रामटेके,आणि राजाराम ग्रामपंचायतचे ग्रामसेविका, ममता गावंडे यांना बोलावून दलितवस्तीत पाहणी करून सुद्धा समस्या समस्या जैसे थे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज दिनांक २७/०९/२०२१रोजी सोमवार ला सभापती यांना सदर दलितवस्तीतील समस्याच्या निराकरण करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे व येत्या सात दिवसात विविध समस्याचे निराकरण न केल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्यात येईल.

यावेळी दलितवस्तीतील नागरिक मधुकर गोंगले,सुधाकर गोंगले,किशोर गोंगले,विलास दुर्गे,व्यंकटेश गोंगले,सुनीता बामनकर,प्रिया बामनकर,जितेंद्र पंजलवार साईनाथ दुर्गे,प्रमोद दुर्गे,सतीश चिपाकृती,उषा चिपाकृती,जेष्ठ नागरिक नामदेव दुर्गे,दीपक अर्का,संदीप,मोतकुरवार,महेश सिडाम,हणमंतू गोंगले,उमाजी शेगावकर आदी नागरिक उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.