Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माढेली– नागरी– खांबाडा रस्ता त्वरित करा अन्यथा तीव्र आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे यांचा इशारा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वरोरा, दि. २८ सप्टेंबर :माढेली नागरी खांबाडा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे वेकोली ची जड वाहतूक सुरु झाली त्यामुळे रस्त्यात खड्डे नसून अक्षरशः रस्त्यात स्विमींग पुल तयार झाले आहे .२ वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे पण साखर झोपेत असलेल्या या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग आली नाही. अभिजित कुडे यांनी तहसीलदार, बांधकाम विभाग, आमदार याना निवेदन दिले तरी देखील त्यानी या रस्त्याच्या दुरुस्तीची तसदी सुद्धा घेतली नाही त्या नंतर अभिजित कुडे यांनी ३ आंदोलन केले त्या नंतर तात्पुरती मलमपट्टी डागडुजी करण्यात आली व वाहतूक सुरळीत सुरू झाली होती पण पुन्हा या रस्त्याने जड वाहतूक सुरु झाल्याने या रस्त्यांची खूप बेकार अवस्था झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तालुक्यातील नागरी हे सीमेवरील शेवटचे गाव आहे . पुढे वर्धा जिल्हयातील हिंगणघाट हे बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. एरवी चड्डा ट्रान्सपोर्ट च्या माध्यमातुन खाणीतील कोळशाची जड वाहतूक वाहन क्षमतापेक्षा जास्त वाहतूक सुरु आहे त्यामुळे रस्ट्यात खड्डे नाही तर मोठें मोठें स्विमींग पुल तयार झाले आहे. आता पिके काडण्याची वेळ आलेली असून सोयाबीन कापूस घरून बाजारात नेणे व शेतातून घरी नेणे अशक्य झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रस्त्यातील खड्डात दररोज वाहन फसून असतात .४,५ फूट खोल खड्डे पडले आहे त्यात पाणी साचले असून त्यामुळे खड्ड्यातील खोलीचा अंदाज येत नसल्याने अनेख अपघात होत आहे. लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.

या रस्त्याच्या खड्डामुळे नियमित सुरु असलेली वरोरा ते माढेली बससेवा महामंडळाने बंद केली आहे त्यामुळे विद्यार्थि व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्याने मोटर सायकल ने प्रवास करणे देखील अशक्य झाले आहे. ३५ किलोमीटर चां रस्त्याने प्रवास करायला तब्बल २ तास लागतात व लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. निवेदन आंदोलन करुन देखील या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे .
या भागातील २०–२५ गावातली स्तानिक लोकांना घेउन वरोरा येथे आंदोलन करु व प्रशासनाला लोकप्रतिनिधी ला धारेवर धरू.

या रस्त्याने त्रस्त असलेल्या लोकांनी अभिजित कुडे याना तुम्हीं नेत्रुत्व करा आम्हीं तुमची साथ देतो अशी ग्वाही दिली आहे . लवकरच असंख्य स्थानिकांना घेउन जन आंदोलन छेडण्याचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे . आपल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने कुडे नेहमीच प्रशासनाला धारेवर धरून काम करण्यास भाग पाडते व त्यांचा आंदोलनाला लोकांचा भक्कम पाठिंबा देखील असतो .

Comments are closed.