Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनसंपत्ती चे व्यवस्थापन करून शास्वत विकास साधणे काळाची गरज; प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि:२६ डिसेंबर : आपल्याकडे असलेल्या वनांवर आधारित उपजीविका समृद्ध करणे आवश्यक असून  कायाद्याची जनजागृती झाली पाहिजे तरच वनांवर आधारित संसाधनापासून ग्रामसभा समृद्ध होतील. तसेच वनसंपत्तीचे संवर्धन करून शास्वत विकास साधणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ‘ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ‘कार्यक्रमाचे उद्घघाटन सोमवारी वन विभाग आलापल्ली यांच्या विश्राम गृह परिसरात झाले.यावेळी ते अध्यक्षस्थाना वरून बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उदघाटक म्हणून वन विभाग आलापल्लीचे डी.सी.एफ. राहुल टोलिया, प्रमुख अतिथी अहेरीचे तहसीलदार ओमकार ओतारी , कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नरेश मडावी, नोडल अधिकारी चेतना लाटकर, कृषी तज्ज्ञ मंगेश भानारकर डॉ. कुंदन दुपारे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अहेरीचे तहसीलदार ओमकार ओतारी म्हणाले, ज्ञान हे यशाची गुरुकिल्ली आहे व या प्रशिक्षणातून ज्ञान संपादन करून पुढच्या पिढीकरिता वन संवर्धन करून ठेवणे महत्त्वाचे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वन विभाग वन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याकरिता ग्रामसभांना मदत करीत आहे. गौण वन उत्पादनाच्या माध्यमातून आपली स्थिती सुधारता येईल. आपल्या विकासासोबत वन्य जीवांचेही संरक्षण करणे आवश्यक आहे.असे मनोगत वनविभाग आल्लापल्लीचे डी.सी.एफ.राहुल टोलिया यांनी व्यक्त केले.

चेतना लाटकर यांनी एकल कार्यक्रमाची माहिती सांगितली. संचालन व आभार समन्वयक ग्रामसभा प्रशिक्षण केंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. नरेश मडावी यांनी मानले.

हे देखील वाचा : 

आकर्षक लोगोच्या माध्यमातून जगात बॉटनिकल गार्डनचा परिचय होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नाशिक जिल्ह्यातील वीर जवान आसाम येथे शहीद

 

 

Comments are closed.