Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक जिल्ह्यातील वीर जवान आसाम येथे शहीद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

नाशिक, दि. २६ डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील भूमिपुत्र सारंग अशोक अहिरे (वय ३२) या सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे.

सारंग आसाममध्ये कार्यरत असताना, सैन्य दलाकडून कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूबाबत निरोप देण्यात आला. सारंग हा गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. आसाम येथे कर्तव्यावर असताना त्यास वीरमरण आल्याचा निरोप आज सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी सैन्य दलाकडून कुटुंबियांना प्राप्त झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांचा शोक अनावर झाला. सारंग यांच्या मृत्यूमुळे नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे, सारंग यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत मात्र अद्याप सविस्तर अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. आज जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले, तसेच अंत्यसंस्काराच्या पूर्वतयारीबाबतही माहिती घेतली.

सारंग यांचे पार्थिव आसाम येथून जायखेडा येथे पोहोचल्यानंतर मंगळवार (दि.२७) सायंकाळी किंवा बुधवार (दि.२७) त्यांच्यावर शासकीय इधवामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सारंग यांच्या पश्चात आई-वडील भाऊ व पत्नी असा परिवार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी साठी निवासी प्रवेशाबाबत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेशाबाबत

 

Comments are closed.