Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफीसर ऑफ द इयर” चा वार्षीक सन्मान सोहळा संपन्न

उत्कृष्ट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय म्हणुन कुरखेडाची निवड प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले पोलीस मदत केंद्र मालेवाडा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १८ जानेवारी : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर वार्षिक सन्मान सोहळा” १७ जानेवारी २०२३ रोजी पांडू आलाम सभागृह, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पाडण्यात आला.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या अधिकारी / अंमलदार यांचेकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली “कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द मंथ” हा उपक्रम दरमहा राबविण्यात येतो.याच माध्यमातून माहे जानेवारी २०२२ ते माहे डिसेंबर २०२२ या कालावधीत पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर अधिकारी / अंमलदार यांनी वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मुल्यमापन करुन त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक व्हावे यासाठी “कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर वार्षिक सन्मान सोहळा” चे दि. १७/०१/२०२३ रोजी पांडू आलाम सभागृह, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले होते. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणेकरीता पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील पोलीस दादालोरा खिडकिची टीम उत्स्फुर्तपणे काम करीत असते. सन २०२२ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व उपविभागीय स्तरावरील खालील अधिकारी / अंमलदार यांना उत्कृष्ट व विशेष कामगिरीसाठी “कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर” च्या माध्यमातून गौरविण्यात आलेले आहे. उत्कृष्ट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय म्हणुन उपविभाग कुरखेडाची निवड करण्यात आली असून सदरचा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा साहील झरकर यांना १०,००० /- रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रथम क्रमांक पोलीस मदत केंद्र, मालेवाडा, द्वितीय क्रमांक पोस्टे एटापल्ली, तृतीय क्रमांक पोस्टे सिरोंचा यांनी पटकाविला असून प्रभारी अधिकारी यांना अनुक्रमे १०,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र, ८,००० /-रु. रोख व प्रशस्तीप्रत्र, ६,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पोमकें कोटगुल, पोमकें रेगुंठा, पोमकें गोडलवाही, पोस्टे पुराडा व उपपोस्टे रेपनपल्ली यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ५,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करीता पोस्टे कोरची यांना ५,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करिता उपपोस्टे जिमलगट्टा यांना ३,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र, तसेच उत्कृष्ट कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार ) करीता पोस्टे भामरागड यांना ५,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करीता पोस्टे धानोरा यांना ३,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र सोबतच उत्कृष्ट कामगिरी (शासकिय योजना) करीता पोमकें ताडगाव ५,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (शासकिय योजना) करिता पोस्टे जारावंडी यांना ३,००० /- रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट नाविण्यपूर्ण योजनेकरीता उपपोस्टे पेरमिली यांना ५,००० रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माहे जानेवारी ते डिसेंबर २०२२ या संपूर्ण वर्षात एकुण ३,२८,६२१ लोकांपर्यंत विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यात गडचिरोली पोलीस दल यशस्वी झाले आहे. यात विशेष बाब म्हणजे माहे डिसेंबर २०२२ या एका महिण्यात ५०,४०५ लाभार्थ्याना लाभ मिळवून देण्यात आला आहे, जो की २०२२ या संपूर्ण वर्षाच्या १/४ एवढा आहे. प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र १३७१६, प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना ७५२८०, विविध प्रकारचे दाखले २००३६९, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा १८३, रोजगार व व्होकेशनल ट्रेनिंग ८७०२, प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत १५३८२, प्रोजेक्ट शक्ती २०२७ व इतर उपक्रम १३२२१ यांचा समावेश आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून भविष्यात ५० लाखाच्या वर नागरिकांपर्यंत योजनेचे लाभ मिळवून देण्याचे ध्येय आहे.

सदर सन्मान सोहळा हा गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान), अनुज तारे ., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच सदर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पोस्टे/ उपपोस्टे / पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी / अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

हे देखील वाचा: 

शिक्षणसेवकांचे नियमितीकरणाचे आदेश अडकले लाल फितीच्या कारभारात

आणि सलोनीने पूर्ण केलं दिवंगत वडीलांचे स्वप्न… सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

 

 

 

Comments are closed.