Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकिंग: रायगडमधील पोलादपूर तालुक्यात कुडपन जवळ २५० फूट दरीत कोसळला वऱ्हाडाचा ट्रक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, 8 जानेवारी : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक थेट 250 फूट दरीत कोसळला असून चार जण जागीच ठार झाले आहेत, तर 30  ते 40 जण जखमी असल्याची माहिती आहे. मदतकार्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर वऱ्हाडाच्या ट्रकला हा अपघात झाला. या ट्रकमधून जवळपास 25 जण प्रवास करत असल्याचं समजते. वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच महाड जवान मदतकार्यासाठी रवाना झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाडची रेस्क्यू टीमही घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील खडपी गावातून लग्नाचे वऱ्हाड कुडपण येथे गेले होते. लग्न लावून परत येताना हा आपघात झाला. 200 ते 250 फूट दरीत ट्रक कोसळला असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.