Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्राथमिक आरोग्य केंद्र मन्नेराजाराम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांची आकस्मिक भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 27 जून : दि. 26 जून 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली कुमार आशिर्वाद यांनी सकाळी 9.00 वाजता भामरागड पंचायत समिती मधील मन्नेराजाराम प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आकस्मिक भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समास्या जाणून घेतल्या तसेच रिक्त पदांची माहिती घेतली.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पूर्व मान्सून तपासणी, मलेरीया तपासणी, रुग्णांची संख्या इ. बाबत माहिती घेतली तसेच मलेरीया रुग्णांची काळजी घेण्यासा सांगितले. मान्सून काळात गरोदर व स्तनदा माता यांची मान्सून पूर्व तपासणी पूर्ण करुन गरोदर माता यांना माहेर घरात दाखल करुन त्यांना त्याठिकाणी सर्व सेवा देण्यास सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गरोदर मातांची संस्थात्मक प्रसूती करण्यासाठी त्यांचे समूपदेशन करुन त्यांना माहेर घरात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. टिबी (TB), कुष्ठरोग, इतर साथीचे रोगाचे आढावा घेऊन त्याविषयी मार्गदर्शन केले.

लसीकरणाचा आढावा घेतला तसेच माता मृत्यू व बालमृत्यू होण्याची कारणे जाणून घेतली. बालमृत्यू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी अतिजोखमीच्या सर्व मातांना संदर्भ सेवा देण्यास मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच गरोदर मातांना आर्यन सुक्रोज देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कुपोषणाची माहिती घेतली व SAM/MAM मुलांची आरोग्य तपासणी करुन ICDS विभागाच्या समन्वयाने कुपोषण कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. असे गट विकास अधिकारी, पंचायत समिती भामरागड यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज 34 कोरोनामुक्त तर 18 नवीन कोरोना बाधित

कोविड बाबत गडचिरोली जिल्हयात स्टेज ३ नुसार नवीन आदेश जारी

मराठा – ओबीसी आरक्षण आणि नवा राजकीय संघर्ष

 

Comments are closed.