Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑनलाईन गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी सायबर कक्षाने केले मेळावाचे आयोजन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मिरा- भाईंदर, 12,ऑक्टोबर :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्हे कक्षाने
सन २०२२ मध्ये आयुक्तालयातील नागरिकांच्या प्राप्त तक्रारींवर वेळीच व तात्काळ कारवाई करुन माहे सप्टेंबर २०२२ पावेतो एकुण रूपये ५८,००, ००० /- (रूपये ५८ लाख ) इतकी रक्कम मुळ तक्रारदार यांना त्यांचे बँक खात्यामध्ये परत मिळवून दिलेली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या दुस-या वर्धापन दिनानिमीत्त सायबर गुन्हे कक्षाने दिनांक ०६/१०/२०२२ रोजी ऑनलाईन गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी तक्रारदार व नागरिकांना बोलावून मेळावाचे आयोजन केले होते.

सदर मेळाव्यादरम्यान श्री.अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांनी उपस्थितांना प्रचलित सायबर गुन्हयांब माहिती देतांना ऑनलाईन लोन अॅप डाऊनलोड करण्यापुर्वी त्याचे सत्यतेची पडताळणी करावी, कोणताही अनोळखी कॉल आल्यास क्रेडीट कार्ड/बँकेशी संबंधित माहिती देवू नये अथवा ओटीपी शेअर करू नये, क्रेडीट कार्डद्वारे व्यवहार करताना त्याची माहिती कोठेही सेव्ह करू नये. क्रेडीट कार्ड वापरकर्त्याने ट्रान्सक्शनचे प्रत्येक एसएमएस तपासावे, त्यामध्ये काही अनियमितता असल्यास तात्काळ संबंधित बँकेस व सायबर सेलकडे तक्रार करावी व सध्या ५ क्र सेवा नव्याने सुरु करण्यात आलेली असल्याने त्याचे संबधित फसवे कॉल, एसएमएस, लिंक प्राप्त झाल्यास त्याला प्रतिसाद देवू नये अशा प्रकारचे मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यक्रमाकरिता सायबर गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी / अंमलदार व ४० नागरिक उपस्थित होते. तसेच उपस्थित तक्रारदार / नागरिकांनी Selfie Frame CYBER CRIME CELL – I Am CYBER SAVIOUR या बरोबर फोटो काढून Social Media Account वर जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रसारीत केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन ३ गुन्हे उघड .

Comments are closed.