Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन ३ गुन्हे उघड .

वालीव पोलीस पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 12,ऑक्टोबर :- वसई तालुक्यातील वालीव पोलीस ठाणे हद्दीतील मागील काही दिवसांमध्ये मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन आरोपी कृष्णा अशोक चनप्पा, वय २० वर्षे, रा. भिमपाडा, धुमाळ नगर, वसई पुर्व यास दिनांक २६/०९/२०२२ रोजी अटक करुन गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने वालीव पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खालील गुन्हयांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे सांगितल्याने ३ गुन्हयांची उकल झाली आहे.

गुन्हा रजि. नंबर व कलम
T८५० / २०२२ भादंवि कलम ३७९, ९३१ / २०२२ भादंविस कलम ४५४, ४५७, ३८०, ३४,
१०१६/२०२२ भादंविस कलम ४५४, ३८०, ३४, ५११ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदरची कामगिरी संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ वसई, पंकज शिरसाठ, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  कैलास बर्वे,  मिलींद साबळे, पोलीस निरीक्षक
(गुन्हे), गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि – ज्ञानेश फडतरे, पोहवा – मुकेश पवार, मनोज मोरे, किरण
म्हात्रे, राजेंद्र फड, सचिन दोरकर, बाळासाहेब कुटे, पोना – सतिष गांगुर्डे, पो. अंम. गजानन गरीबे,
सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ऋतुजा लटके यांना गळाला लटकवण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न .

Comments are closed.