Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऋतुजा लटके यांना गळाला लटकवण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न .

तर आयारामाला तिकीट दिल्यामुळे भाजपमध्ये नाराजी .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 12,ऑक्टोबर :- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम आता जोरदार वाजू लागले आहेत. आणि त्यात दिवंगत आमदार रमेश लटके यांना शिवसेना ठाकरे गटाच्या त्या संभाव्य उमेदवार असल्याने शिंदे गट अस्वस्थ आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ऋतुजा लटके यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना ’ पक्षात आणून आपला पक्ष व भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. भाजपच्या मुरजी पटेल यांनी मतदारसंघात आपला प्रचार सुरु केला असला तरी शेवटच्या क्षणी ऋतुजा लटके शिंदे गटात येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपकडून अद्याप मुरजी पटेल यांनी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दोन दिवसांपूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनीही अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले होते. शिंदे गटातील आमदारही यासाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचाच उमेदवार रिंगणात उतरेल का, याबाबत कमालीचा साशंकता निर्माण झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता शेवटच्या दोन दिवसांत काही चमत्कार घडणार का, हे पाहावे लागेल.

अनेक इच्छुक असताना आयारामाला तिकीट का?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘अंधेरीच्या उमेदवारीवरुन भाजपात नाराजीचा सूर’ या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानेही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ केला होता. त्यामुळे ऋतुजा लटके यांची बाजू भक्कम झाली होती. परंतु, आता ऋजुता लटके यांनाच गळाला लावण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. रमेश लटके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले सख्य होते. रमेश लटके जर हयात असते, तर ते आपल्याबरोबरच आले असते, असा शिंदे गटाचा दावा आहे. तसेच ऋतुजा लटके यांच्याविरोधात आपण निवडणूक लढवू नये, असेही शिंदे गटातील काही नेत्यांचे मत होते. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी आपल्या पक्षात यावे आणि त्यांना शिंदे गट व भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा :-

आता शिवसेनेतच ‘मशाल ‘ विरुद्ध ‘ढाल तलवार’ असा रंगणार सामना..

Comments are closed.