Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) मोहीम २०२५ व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ बाबत जिल्हास्तरावर कार्यशाळा सपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 16 :- गडचिरोली जिल्हयात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम 2025 व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ राबविण्यात येणार आहे. हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ प्रभावीपणे राबविण्याचे दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) मोहीम
हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम गडचिरोली जिल्यातील धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा, वडसा, आरमोरी, व चामोर्शी या सात तालुक्यात हि मोहीम राबविण्यात येणार आहे.
हत्तीरोग आजार हा जिल्ह्यातील आरोग्याची गंभीर समस्या असून या आजारामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम दिसून येतात. याकरिता शासनाने हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रम सामुदायिक औषधोपचार मोहिमेंतर्गत डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यासोबातच आयवरमेक्टीन या तीन औषधांचा वयोगट व उंचीनुसार उपचार देऊन हत्तीरोग निर्मुलन करता येऊ शकते. याकरता गडचिरोली जिल्यातील सात तालुक्यातील ७७१३७१ लोकसंखेला हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) मोहीम कालावधीत गृहभेटी दरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांच्या समक्ष २ वर्षापेक्षा कमी वयाची बालके व गरोदर माता तसेच गंभीर रुग्ण वगळून सर्वाना हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे. या मोहिमेत सात तालुक्यातील लाभार्थींनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा डोस घेण्याचे आवाहन राजेंद्र भुयार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प गडचिरोली यांनी केले आहे .
कुष्ठरोग शोध अभियान २०२५
“कुष्ठरोग शोध अभियान २०२५ ही मोहिम दिनांक ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राबविण्यत येणार आहे. संपुर्ण जिल्हयात कुष्ठरोग शोध अभियान २०२५ दिनांक 31/01/2025 पासुन 14 फेंब्रुवारी पर्यंत राबवली जाणार आहे. सदर मोहिमेत एकूण १०७९९७२ एवढ्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण करण्याकरीता आशा वर्कर व पुरुष स्वयंसेवक यांची टिम तयार करून ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घरोघरी जावून प्रत्यक्ष लोकांची तपासणी करण्यात येणार आहे व शोधण्यात आलेल्या संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करुन निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांना त्वरीत औषधपचार करण्यात येणार आहे.तरी सदर कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी करण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन डॉ प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी करण्यात येत आहे.

“कुष्ठरोग शोध अभियान २०२५ व हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना अविश्यांत पंडा जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. जिल्हास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी यांचे हत्तीरोग औषधोपचार मोहिम व कुष्ठरोग शोध अभियान बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी, उपस्थित होते तसेच राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून डॉ. समाधान देबाजे, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार व जिल्हा स्तरीय प्रशिक्षक म्हणून डॉ सचिन हेमके सहाय्यक संचालक (कुष्ठरोग),डॉ प्रेरणा देवताळे वैद्यकिय अधिकारी कुष्ठरोग, डॉ पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी उपस्थित होते तसेच सदर प्रशिक्षणास जिल्हास्तरीय अधिकारी डॉ. अमित साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ प्रफुल गोरे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ रुपेश पेंदाम हत्तीरोग अधिकारी गडचिरोली, डॉ. अविनाश दहीफळे, हत्तीरोग अधिकारी धानोरा,तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी, तालुकास्तरीय पर्यवेक्षक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.