Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाटक सामाजिक प्रबोधनाचे सशक्त आणि प्रभावी माध्यम- सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्राचार्य डॉ.सदानंद बोरकर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला. त्या निमित्त नाट्यतंत्र लेखन कार्यशाळा काल आयोजित केली. या कार्यशाळेकरिता मार्गदर्शक सुप्रसिद्ध नाट्यलेखक, प्राचार्य डॉ. सदानंद बोरकर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नाटकाची भाषा लेखकाच्या विचाराला आकार देणारी ठरते असे सांगून आपल्या नाट्य लेखन निर्मितीचे अनुभव विश्व विद्यार्थ्यांसमोर उलगडले.
या कार्यशाळेत नाट्यलेखनाचे विविध पैलू, संवाद- लेखन, पात्रांची- निर्मिती, कथानकाचा- विकास, आणि रंगमंचावर त्या लिखित सामग्रीचे सादरीकरण कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

नाटकांमधून समाजातील वेगवेगळ्या समस्या, अन्याय, असमानता, मानवी हक्क, आणि नैतिकतेची गोष्टी उचलली जातात, आणि त्या मुद्द्यांवर प्रगल्भ विचार मांडले जातात. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जागरूकता निर्माण होते. नाटकाचा संवाद, त्याची भाषा, आणि रंगमंचावरील सादरीकरण सर्व काही एकाच ध्येयासाठी कार्य करत असतो – ते म्हणजे समाजाच्या सुधारणेसाठी आणि प्रबोधनासाठी असे सांगताना त्यांनी स्व अनुभवाच्या आधारे त्यांच्या गाजलेल्या माझं कुंकू मीच पुसल! आत्महत्या,दोन घराचं गावं, गंगा-जमुना,या नाट्यनिर्मिती मागील आशयसूत्रे विस्ताराने मांडली. एकूणच नाटक हे समाजाचा आरसा असून सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरते.असे ते बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, कार्यशाळा आयोजक डॉ. हेमराज निखाडे, आणि सहायक प्राध्यापक डॉ. सविता गोविंदवार विचारपीठावर उपस्थित होते. डॉ. नीलकंठ नरवाडे यांनी बोरकर यांचा परिचय करून दिला. तुषार दुधबावरे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. अमोल चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रिया गेडाम, डॉ.शिल्पा आठवले,डॉ. संजय डाफ, प्रा.रोहित कांबळे, डॉ.अनिरुद्ध गचके, यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.