Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दलित मुस्लिम मराठा आणि ओबीसिंच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानात एल्गार

दलित आदिवासी मागासवर्गीयांचे हक्काचे पदोन्नतीमधील आरक्षण त्वरित द्या - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 6 जुलै  दलित आदिवासी इतर मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण त्वरित देण्यात यावे; राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखावेत; मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये 5 टक्के आरक्षण द्यावे; ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत करावेत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत यासह अनेक मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आज आझाद मैदान येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एल्गार पुकारत महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी नाशिकमधील ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यास रिपाइं चा पाठिंबा आहे. असा पुनरुच्चार ना रामदास आठवले यांनी केला. या निदर्शनाचे आयोजन रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे केले. त्यांनी गनिमिकाव्याने व्यहरचना करीत आझाद मैदानात रिपाइंचे शेकडो कार्यकर्ते उतरविले. या निदर्शनास येणाऱ्या रिपाइं कार्यकर्त्यांना अनेक भागात मुंबई पोलिसांनी अटकाव केला होता. त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात मोठ्या कौशल्याने रिपाइं चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात दलित अत्याचार वाढत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चोतोडा गावात हिवराळे परिवारावर झालेला हल्ला अत्यंत अमानुष होता या हल्ल्याचा तीव्र निषेध ना रामदास आठवले यांनी यावेळी केला. दलित अत्याचार झालेल्या गावात बुलडाणा चे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाऊन चिथावणीखोर जातीवादी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा निषेध करीत संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.

यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ; माजी आमदार सुमंतराव गायकवाड; काकासाहेब खांबळकर; जगदीश गायकवाड; दयाळ बहादुरे श्रीकांत भालेराव;सिद्धार्थ कासारे; विवेक पवार; हरिहर यादव; ऍड आशा लांडगे शिलाताई गांगुर्डे; अनिल गांगुर्डे; अभया सोनवणे; सोना कांबळे;संजय पवार ; नंदू साठे; विजय साबळे सुमित वजाळे; रतन अस्वारे आदी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  :

ओ.बी.सी प्रवर्गातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्रुटींची पुर्तता करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

 

Comments are closed.