Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यापीठाचा विस्तार करत असताना कौशल्य विकासावर भर द्यावा – मंत्री विजय वडेट्टीवार

गोंडवाना विद्यापीठ आढावा आणि मान्सुनपूर्व बैठक संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 21 जून : गडचिरोली जिल्ह्यात विद्यापीठ असून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे राज्याचे बहूजन कल्याण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिपादन केले.

विद्यापीठामध्ये मोठया प्रमाणात सद्या विस्ताराची कामे आता हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक युवकांना समोर ठेवून त्यांच्यामध्ये कौशल्य वाढ होण्यासाठी त्यांना कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमही निवडता येईल त्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरु करा, त्यासाठी प्रस्ताव सादर करा असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कौशल्य विकासावर आधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवासा वरखेडी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम व विद्यापीठाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिल्यास स्थानिक गुणवत्तेला वाव देता येईल. तसेच जिल्ह्यातील उपलब्ध साधन संपत्तीचा वापरही करता येईल असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. कौशल्यावर आधारित प्रस्ताव शासनास सादर केल्यानंतर त्यासाठी मंजूर निधी वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

कौशल्य विकासावर भर देण्यासाठी, प्रस्ताव मंजूरीसाठी मंत्रालयस्तरावर एक दिवसाच्या बैठकीचे आयोजन करु असे ते म्हणाले, कौशल्य विकासाबाबत जिल्ह्यातील प्रश्नांबाबत त्या दिवशी चर्चा करु. यात पालकमंत्री, संबंधित मंत्री, सचिव, जिल्हा प्रशासन सहभागी असेल. याबैठकीतून नक्कीच प्रलंबित व नियोजित कौशल्य विकास योजना मार्गी लावू असे ते यावेळी म्हणाले.

इंजिनिअरींग कॉलेजसाठी लागणाऱ्या जागेबाबत चर्चा- विद्यापीठ अंतर्गत प्रस्तावित इंजिनिअरींग कॉलेजसाठी आवश्यक जागेवरही चर्चा करण्यात आली. याबाबत विविध प्रस्ताव येत आहेत. यातील बोदली येथील बंद असलेल्या इंजिनिअरींग कॉलेजचाही विचार करण्यात यावा असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचना केल्या.

मान्सुनपूर्व आढावा- आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेतली. मनुष्यबळ, साहित्य उपलब्धता याबाबत चर्चा झाली. मागील पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता त्या प्रकारच्या आपत्तीवर प्रशासनाने तयारी ठेवावी असे ते यावेळी म्हणाले.

गोसीखुर्द किंवा दक्षिणेकडील धरणांबाबत राज्यस्तरावरुन त्या त्या प्रशासनाबरोबर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे अचानक येणारे संकट यावेळी टाळता येईल. मात्र पावसामुळे कोणाला त्रास होवू नये व आवश्यक मदत वेळेत मिळावी म्हणून सतर्क रहा अशा सूचना त्यांनी बैठकीत उपस्थितांना दिल्या.

हे देखील वाचा :

बळजबरीने मोबाइल पैसे हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिसांना मिळाले यश

गडचिरोली जिल्ह्यात आज 33 कोरोनामुक्त तर 13 नवीन कोरोना बाधित

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड

 

Comments are closed.