Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सजग रेल्वे प्रवाशांचा रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 नालासोपारा/ वसई 17 नोव्हेंबर :- वसई तालुक्यातील नालासोपारा रेल्वे स्थानकात आयोजित रक्तदान शिबिराला सजग रेल्वे प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. रोटरी क्लब ऑफ विरार,रोटरी क्लब आँफ वसई, विवा महाविद्यालयाच्या रा.से.यो. एकाकाने आणि जगजीवनराम रक्तपेढी यांच्या सोबत नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या आवारात १४ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या शिबिरात एकूण ९० पिशव्या रक्त गोळा करण्यात आले.

रोटरी क्लब च्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये आरोग्य शिक्षण रोजगार तसेच मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी रोटरी क्लबचा नेहमीच पुढाकार असतो. याच उद्देशाने रोटरी क्लब ऑफ विरार,रोटरी क्लब आँफ वसई ,विवा महाविद्यालयाच्या रा.से.यो. एकाकाने आणि जगजीवनराम रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या आवारात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ विरार चे प्रेसिडेंट रोटेरियन प्रा.महेंद्र घरत, रोटेरियनस श्री राजेश कासट, डाॅ चद्रकांत, प्रिया, भक्ती तसेच रोटरी क्लब ऑफ वसईचे प्रेसिडेंट रोटेरियन श्री.मेहुल माने ,अरूण पाटील व ईतर पदाधिकारी ,केअर आणि क्युअर हाॅस्पीटल नालासोपारा तसेच इतर संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

18 नोव्हेंबर रोजी अर्नाळा बीचवर स्वच्छ्ता मोहीम.

रोटरी क्लब ऑफ विरार तर्फे अर्नाळा येथील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ विरार आणि रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता अर्नाळा बीच येथे ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली असून या स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन समुद्र किनारा स्वच्छ करण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ विरार चे प्रेसिडेंट रोटेरियन प्रा.महेंद्र घरत यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.