Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोमूत्र शिंपडल्याने नवा वाद

शिंदे गटाची कारवाईची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 17 नोव्हेंबर :- शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या स्मृती स्थळावर काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे सर्व नेते येऊन बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन वंदन करून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडले यातून नवीन वाद निर्माण झाला असून ठाकरे गटाच्या नेत्यांवर पोलिसांनी कारवाई करावी म्हणजे शिंदे गटाचे दादर येथील विभागप्रमुख गिरीश धानुरकर यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांविरुद्ध तक्रार केली आहे.

याबाबत माहिती घेतली असता असे समजले की स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्मृती स्थळावर येवून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले. ही घटना खटकल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी येवून स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडले. इथे दोन्ही गटांमध्ये वादाची ठिणगी पडली. दरम्यान शिंदे गटाच्या गिरीश धानूरकर यांनी ठाकरे गटाच्या विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, अरविंद सावंत यांच्याविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.