Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फडणवीस दिल्लीत ! कोशारीना मिळणार नारळ ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे वारंवार वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांची फार मोठी अडचण झाली आहे. कोशारीना सावरता सावरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होत आहे. पहाटेचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी, १२ राज्यपाल नियुक्ती आमदारांचे प्रकरण, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेली विधाने, महाराष्ट्र आणि मराठी माणूस याविषयी केलेली टिप्पणी , आणि आता तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेले आक्षेपार्ह विधान यामुळे राज्यपाल स्वतः अडचणीत येत आहेत आणि भाजपला सुद्धा अडचणीत आणत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलच्या विधानामुळे छत्रपतींचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार विरोध करत राज्यपालांच्या तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. सर्वच राजकिय पक्षांनी राज्यपालांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांना तातडीने बदलावे या मागणीसाठी जोर वाढू लागला आहे. भाजप नेत्यानाही राज्यपालांच्या विरोधात भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीला महत्व आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्रीय अर्थसंकल्पा वरील चर्चेसाठी फडणवीस हे दिल्लीला गेल्याचे बोलले जाते. पण त्याचवेळी राज्यपाल कोशारी देखील दिल्लीत आहेत. त्यामुळे राज्यपाल बदलाच्या भूमिकेला वेग आल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल बदलले जाऊन महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळतील का ? हे लवकरच।समजेल.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला अटक सीबीडी पोलिसांची यशस्वी कामगिरी

विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

Comments are closed.