Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला अटक सीबीडी पोलिसांची यशस्वी कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी मुंबई, 25 नोव्हेंबर :- सीबीडी बेलापूर हद्दीत अंमली पदार्थांचा व्यापार चालतो अशी चर्चा होती .त्यानंतर श्री.बिपीन कुमार सिंग – पोलीस आयुक्त ,डॉ.जय जाधव सह पोलीस आयुक्त , महेश घुर्ये मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, यांनी नवी मुंबई नशामुक्त करण्याचे व अमली पदार्थ व प्रतिबंधित गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करणारे इसमांविरुध्द विशेष मेाहीम सुरू करून कारवाई करण्याचे आदेश वेळेावेळी दिलेले आहेत.

दि.२४/११/२०२२ रोजी बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सीबीडी पोलीस ठाणे हद्दीत टाटानगर झोपडपट्टी येथे महिलांना अबिदा शेख वय ३५ते ४० वर्षे ही गांजा अमली पदार्थ विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दोन पंचा समक्ष छापा टाकला असता महिला अबिदा जहीर शेख – वय ४० वर्षे रा. टाटानगर झोपडपट्टी सीबीडी बेलापूर नवी मुंबई ही मिळाली तिच्या ताब्यात १ किलो १९६ ग्रॅम, वजनाचा ३०,०००/- रुपये किमतीचा गांजा अमली पदार्थ मिळून आल्याने तिच्याविरुद सीबीडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १९३/२०२ एन डी पी एस कायदा कलम ८(क),२०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करावे

Comments are closed.