Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनमंत्री संजय राठोड यांच्या बाबतीत नियमानुसार चौकशी होणार- अनिल देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. १५ फेब्रुवारी: वनमंत्री संजय राठोड यांच्या बाबतीत नियमानुसार चौकशी होणार आणि जे काही चौकशी मध्ये समोर येईल त्या पद्यतीने राज्य शासन निर्णय घेणार असे राज्याचे ग्रूह मंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर येथे पत्रकारांना सांगितले. कोरोणातून बरे झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले या संदर्भात मुख्यमंत्री अगोदरच बोललेले आहेत. जे काही विरोधी पक्ष आरोप करीत आहे त्यात काहीही तथ्य नाही असेही ते म्हणाले. पुण्याच पोलिस खात व्यवस्थित काम करीत आहे असेही ते म्हणाले. चौकशीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर वस्तुस्थिती समोर आल्यानंतर राज्य शासन निर्णय घेईल असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.