Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय जन संसदेची जिल्हास्तरीय बैठक.

योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.. मान्यवरांचा सूर.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क

गडचिरोली ०१ नोव्हे : भारतीय जनसंसद जिल्हा समितीची बैठक नजीकच्या सेमाना देवस्थानात खुल्या मैदानावर बैठक पार पडली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असा सूर बैठकीत मान्यवरांनी काढला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बैठकीला प्रामुख्याने जनसंसद राज्य समितीचे अध्यक्ष अशोक सबण, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीलिमा सिंग, प्रा. अरुण खरवडे, जिल्हा सचिव नीलकंठ संदोकार, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बांगरे गडचिरोली तालुकाध्यक्ष योगेश कुडवे ,अहेरी तालुकाध्यक्ष सुरेश दुर्गे ,देसाईगंज तालुकाध्यक्ष नानाजी ठाकरे, वासुदेव ठाकरे, पिंपळशेंडे, संतोष दुपारे, किशोर चुचुवार, बंडू सोमनाने, धनंजय डोईजड ,चंद्रशेखर सिदाम,विजय हर्षे, चामोर्शी तालुका सचिव तुषार बनपूरकर ,दीपेश आलेवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रसंगी जननसंस्थेच्या नवीन कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. लवकरात लवकर जिल्हा जनसंपर्क व तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी ठरविले. भारतीय जन संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले याप्रसंगी अशोक संपन्न यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन केले आहे.

Comments are closed.